फोंडा – फोंडेकर वाडी ची धोकादायक लाईन बदलली, ग्रामस्थांमध्ये समाधान. पालकमंत्र्यांचे आभार !

हेमंत फोंडेकर यांचा पाठपुरावा यशस्वी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेली सुमारे दीड – दोन वर्षे फोंडाघाट येथील फोंडेकरवाडी मधील धोकादायक थ्री फेज लाईन नुकतीच वीज मंडळाच्या ठेकेदारांनी बदलली. कुबल – तावडे- कोंडेकर – परब यांच्या शेतातून जाणारी ही अत्युच्च दाबाची थ्री फेज लाईन सर्वांसाठी धोकेदायक बनली होती. विशेषता पावसाळ्यात व वादळ वाऱ्यात सदर लाईन शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना व लगतच्या घरांना अत्यंत धोकेदायक होती …

याबाबत वाडी तील सामाजिक व भाजपाचे कार्यकर्ते हेमंत फोंडेकर यांनी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे निदर्शनास ही बाब आणून दिली. अर्ज- पत्रव्यवहार केला. त्यांच्या आदेशाने जिल्हा परिषद फंडातून लाईन बदलासाठी निधी मंजूर झाला .नुकतीच जुनी थ्री फेज लाईन बदलून, कुबल गिरण ते कोंडेकरवाडी ट्रांसफार्मर अशी निर्धोक लाईन बदलली. त्यामुळे वाडी वरील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले…

error: Content is protected !!