अपघातातील जखमींची केली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विचारपूस…!

कणकवली (प्रतिनिधी): लग्नाचे व-हाड घेऊन देवगडकडे जाणाऱ्या वाहनाचा वागदेजवळ दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातातील जखमी रुग्णांवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय सिंधुदुर्ग येथे उपचार सुरू आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज आपल्या सिंधुदुर्ग येथील भेटीत सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली व जखमींवर तातडीने योग्य आवश्यक उपचार करण्याच्या सूचना तेथील डॉक्टरांना दिल्या, यावेळी माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!