कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे येथील ब्राह्मण देव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जुन्या झाडाच्या फांद्यांना वनव्यामुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
झाडाला लागलेली आग रस्त्यालगत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन व स्थानिकांनी तत्काळ उपाययोजना करत नांदगावच्या दिशेने जाणारा रस्ता तात्पुरता बंद करून वाहतुकीसाठी डायव्हर्शन करण्यात आले.












