शिडवणे नं. १ शाळेत खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस उत्साहात साजरा

रफिक नाईक यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस जि.प.शाळा शाळा शिडवणे नं. १ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते केक कापून साहेबांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तर यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांचे वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला माजी वित्त आणि बांधकाम सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये,सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक,माजी पं.स.सदस्य सौ तृप्ती माळवदे,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल,भाजप ओबीसी कणकवली तालुका महिला अध्यक्ष उज्ज्वला चिके, शक्ती केंद्र प्रमुख सुर्यकांत भालेकर, शिवसेना तालुका प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, युवा कार्यकर्ते संकेत लोकरे,शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संचिता टक्के, शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे, गायत्री वाघरे,उर्मिला सुतार,योगेश सुतार,अन्वी येतकर,तारीफ शेख आणि अरविंद धाक्रस यांसह अनेक मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.तसेच शाळेतील शिक्षकवृंद वेदिका चव्हाण,सुरेंद्र यादव,हेमा वंजारी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान रफिक नाईक,तृप्ती माळवदे आणि सूर्यकांत भालेकर यांनी आपल्या मनोगतातून खासदार नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये यांनीही संपूर्ण गावाच्या वतीने खासदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

वाढदिवसाचे औचित्य साधून राणे साहेबांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थित ग्रामस्थांना रफिक नाईक यांचे वतीने ‘स्नेहभोजनाचा’ लाभ देण्यात आला.शाळेला आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या या अमूल्य अशा योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि खासदार साहेबांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

error: Content is protected !!