डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजनांचा सक्सेस पासवर्ड – गटविकास अधिकारी श्याम चव्हाण

मालवण पं. स. मध्ये भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन

मालवण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समस्त भारतातील बहुजनांचा सक्सेस पासवर्ड आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीने बाबासाहेबांनी समाजाला दिशा दिली. आजच्या जागतिक युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुद्धाच्या शांततेची आणि घटनाकार बाबासाहेबांच्या शिकवणुकीची गरज आहे. असे प्रतिपादन मालवण पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वि, जयंती मालवण पं. स. च्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला बीडीओ श्याम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने, तसेच मालवण तालुका चर्मकार संघटनेचे तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी चव्हाण म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मानवतेच्या शिकवणुकीची आजघडीला समाजाला गरज आहे. बाबासाहेबांची प्रतिमा डोक्यावर घेऊन त्यांना अभिवादन करतानाचे त्यांचे विचार आपल्या डोक्यात घेणे आणि आचरणात आणणे आवश्यक आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, कृषी विस्तार अधिकारी विनायक जाधव, विस्तार अधिकारी सूरज बांगर, केंद्रप्रमुख श्री.पारकर, पं. स. कर्मचारी गीतेश कोदे, साळवे, श्रीमती राऊत, श्रीमती पराडकर, श्रीमती धुरी, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण, तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण, उपाध्यक्ष घन:श्याम चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर, सचिव संभाजी कोरे, मालवण शहराध्यक्ष संजय बीडवलकर, शहर सचिव पद्माकर माणगावकर, तालुका सल्लागार श्रीकृष्ण पाडगावकर, सुरेश चव्हाण, दीपक बिडवलकर, दीपक माणगावकर, भास्कर पाताडे, भंडारी हायस्कुलचे शिक्षक जाधव सर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!