कणकवलीत शिक्षक समितीचा ‘गुणगौरव व शिक्षक सन्मान’ सोहळा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना पर्यावरण स्नेही बनवा – सभापती हर्षदा वाळके

 पुढील वर्षीपासून ५ विद्यार्थी दत्तक घेणार – उपसभापती राजेश सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा-कणकवली यांच्या वतीने आयोजित ‘दत्तक विद्यार्थी, गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ नुकताच तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज,महिला आघाडी अध्यक्षा दर्शना हुंबे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तालुक्यातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे कौतुक आणि सेवानिवृत्त शिक्षकांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके आणि उपसभापती

राजेश सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी समितीच्या ‘शिक्षण ज्योत’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. धीरज हुंबे यांनी वार्षिक कार्य अहवालातून वर्षभरातील उपक्रमांचा आढावा मांडला.

पर्यावरण संरक्षणाचा संदेश

सभापती हर्षदा वाळके

शिक्षक समिती राबवत असलेल्या विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रमाबद्दल भरभरून कौतुक केले. यांनी मार्गदर्शनादरम्यान शिक्षकांना आवाहन केले की, “विद्यार्थ्यांच्या प्रगतीसोबतच त्यांना प्लास्टिकमुक्त शाळा आणि जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून देऊन पर्यावरण स्नेही बनवावे.” उपसभापती राजेश सावंत यांनी शिक्षकांच्या दातृत्वाचे कौतुक करत, पुढील वर्षापासून स्वतः ५ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली. तसेच शिक्षक समिती ही केवळ शिक्षकांसाठी लढणारी संघटना नसून विद्यार्थी, समाजाप्रती आदर असणारी एक आदर्शवत संघटना आहे. अशा संघटनेकडून सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन दत्तक विद्यार्थ्यांनी घेण्यात आले हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

विद्यार्थ्यांचा गौरव आणि दत्तक योजना

समितीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत तालुक्यातील आरुषी जाधव, वैदेही चव्हाण, परीनीती बोर्डवेकर, वेदा वायंगणकर, जेसी,का फर्नांडिस, गायत्री नानचे, श्रुती जाधव, रेवती दळवी, शनया गुरव, कैवल्य राणे, हर्षद साळसकर भाग्यश्री मेस्त्री,  मनस्वी धुळे हार्दिक उरणकर, सार्थक देसाई, पूर्वा बागवे, देवांश गुरव, कार्तिक कदम, जानवी राठोड, अर्पित कोर्लेकर, स्वराज्य मांडवकर, आर्यन कासार्डेडेकर  या २२ गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक पालकत्वासाठी निवड करण्यात आली. तसेच शिष्यवृत्ती , नवोदय परीक्षा आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम, पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्कॉलरशिप परीक्षा – अर्णव भिसे, गौरांग वायंगणकर, शुभम गावडे, रचिता सदडेकर, लावण्या सावंत, पार्थ गुरव, विभा धुमाळे, मयंक बुचडे, उत्कर्ष परब, अथर्व सावंत, नातू सोहम APJ अब्दुल कलाम परीक्षा* – देवेन पाटील, चैतन्य गवाणकर, मंदार जाधव, विराज कल्याणकर, अन्वय देसाई, गाथा कांबळे नवोदय निवड – रचिता सदडेकर, रिदयांशू गुरव, पार्थ गुरव, ओम पवार, मृण्मयी ब्रह्मदंडे, वांगणकर गौरांग, महालक्ष्मी मेस्त्री, हेरंब चव्हाण, विभा धुमाळे, सुप्रबुद्ध पाटणकर , दुर्वेश शाळा व क्रीडा नैपुण्य- ज्ञानी मी होणार साळीस्ते नंबर 1, स्वराज जाधव, मनस्वी अपराध, आराध्य सावंत, समीक्षा गावकर, अनय पाष्टे स्कॉलरशिप सराव परीक्षा- चैतन्य गवाणकर, प्रज्वल मसूरकर, स्वरा वरक, आदित्य घाडीगावकर, आर्यन नाराम, दूर्वा मेजारी, आराध्या राणे, अनामि कांबळे, चिन्मय राणे, वृषाली कदम, जक्ष कोरगावकर

या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सर्वांचे व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

तसेच परसबाग स्पर्धेत साळिस्ते नं. 1, नडगीवे नंबर 1, वाघेरी नंबर 1 आणि ‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियानात **खारेपाटण, करंजे व तळरे** शाळांनी बाजी मारल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले

सेवानिवृत्तांचा सन्मान

तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक विद्या पेडणेकर, सुनील तांबे, श्रद्धा बोभाटे, स्मिता कदम, अभय वालावलकर, स्वाती कदम, शरद कदम, स्नेहा गोठणकर, स्मिता कदम अंबाजी रासन, मृनाली पिसे, राधिका सावंत यांच्यासह एकूण १२ सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीमती वेदिका चव्हाण, श्री सदाशिव राने, श्री संतोष पाटील, श्रीमती ज्योती ब्रह्मदंडे, श्रीमती सुप्रिया म्हस्कर, प्रवीण कुबल इत्यादी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याला राज्य महासचिव राजन कोरगावकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, नंदकुमार राणे,राज्य कार्यकारणी सदस्य सचिन मदने, प्रशांत मडगावकर,नामदेव जांभवडेकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष महेंद्र पावसकर प्रवक्ते सुधीर गोसावी, कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर उपाध्यक्ष रुपेश गरुड उपाध्यक्ष धीरज हुंबे, जिल्हा उपाध्यक्ष अजय तांबे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रवीण कुबल, शिक्षक पतपेढी संचालक संतोष मोरे. नारायण नाईक,विजय सावंत,संतोष राणे,श्रीकृष्ण कांबळी, सिताराम लांबर, संतोष राणे,ऋतुजा जंगले, मंगेश कांबळी,किशोर कदम, रफिक बोबडे, प्रवीण शेर्लेकर,   प्रसाद जाधव, शशांक आटक,  नंदकिशोर पाडगावकर, प्रफुल्ल जाधव,  शिक्षक नेते टोनी म्हापसेकर महिला आघाडी शिक्षक नेत्या नेहा मोरे,महिला आघाडी सचिव मयुरी राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वरलाल कदम, संतोष राणे,  संदीप गोसावी, किशोर गोसावी, भाऊ आजगावकर,विनिता शिरसाट, प्रशांत दळवी, प्रवीण कदम,संदीप ब्रह्मदंडे,जगन्नाथ घाडीगावकर,विजय पाताडे,संतोष कांबळे,प्रकाश वाडकर,सुभाष गावकर,दिनेश जंगले,नंदकुमार सरंगले, राजेंद्र कडुलकर,अजय सावंत,देऊ होळकर,सुनील गावकर,श्रीकांत बुचडे,संतोष तांबे,संजय तांबे,शिवाजी मडव,प्रदीप श्रावणकर,सत्यवान घाडीगावकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.       

तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज यांनी प्रास्ताविक केले, रश्मी आंगणे व ज्योत्स्ना गावडे यांनी सूत्रसंचालन केले, तर तालुका सचिव निलेश ठाकूर यांनी आभार मानले. शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाला  कार्यक्रमाची सांगता लकी ड्रॉने करण्यात आली.

error: Content is protected !!