वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

वक्तृत्व स्पर्धेत ब्रिजेश तुळसणकर तर वेशभूषा स्पर्धेत शौर्या चौगुले व देव्यांशी खोपडे हिने पटकावला प्रथम क्रमांक

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांद्वारे साजरी होत आहे. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर प्रशाले पासून ते दत्त मंदिर चौक व बौद्ध विहार या मार्गावरुन ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार केला.प्रशालेचे एन.सी.सी.कॅडेट या रॅलीत सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रॅलीची सांगता करण्यात आली तेव्हा वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते आंबेडकर भवन परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे व जि.प.सदस्या श्रावणी रावराणे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व बौद्ध सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धा दोन गटांमध्ये संपन्न झाल्या शिशु ते बारावी पर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या वत्कृत्व स्पर्धेत ब्रिजेश संदेश तुळसणकर याने प्रथम क्रमांक, जागृती गणेश घाडी हिने द्वितीय क्रमांक तर श्रीया विजय मरळकर हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच वेशभूषा स्पर्धा दोन गटांमध्ये संपन्न झाली यामध्ये मोठ्या गटात शौर्या राहुल चौगले हिने प्रथम क्रमांक, दर्श चित्रसेन होळकर याने द्वितीय क्रमांक व शिफा नजरुद्दीन जमादार हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच शिशू वर्षाच्या लहान गटात देव्यांशी दिनेश खोपडे हिने प्रथम क्रमांक ,हिमांश समीर माईनकर याने द्वितीय क्रमांक तर अक्षरा अजय सानप हिने तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्या सर्व स्पर्धकांना बौद्ध सेवा संघ वैभववाडीच्या वतीने रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. प्रशालेचे शिक्षक शिंदे एस.बी. यांनी उपस्थित सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक तळमळ व संविधान निर्मितीतील आंबेडकरांचे योगदान याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.जाधव यांनी केले. तर वक्तृत्व व वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून एन.व्ही.प्रभू, व्हि.एस.मरळकर, एम.एस.चोरगे, एफ.एच.सारंग यांनी केले.
यावेळी वैभववाडी वाभवे वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे,माजी वित्त व बांधकाम सभापती तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई चे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, तालुका बुद्ध सेवा संघ उपाध्यक्ष संतोष कदम सचिव रवींद्र पवार, माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शारदा कांबळे, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!