आचरा (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती चिंदर ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे व ग्रामपंचायत वरीष्ठ कर्मचारी विश्राम माळगांवकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, रोहित पाटील, समिर अपराज, रोशनी फर्नांडिस, रणजित दत्तदास, तुषार पवार आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
चिंदर ग्रामपंचायत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन….!












