शेर्पे व बेर्ले येथील विविध विकास कामांचा खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते प्रारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी ) : शिवसेना पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून कणकवली तालुक्यातील शेर्पे व बेर्ले या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते अतुल रावराणे,सचिन सावंत, राजू राणे,खारेपाटण विभाग शिवसेना प्रमुख एकनाथ कोकाटे, साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर,कुरगावणे – बेर्ले उपसरपंच बबलू पवार, वारगाव माजी सरपंच बापू नर, बेर्ले माजी सरपंच बाळा राऊत,ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते मधुकर वळंजू,संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.तर शेर्पे येथील कार्यक्रमास शेर्पे सरपंच सौ विशाखा पांचाळ,भूषण शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.

      शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून शेर्पे भटवाडी येथील बोअरवेल करीता २ लाख रुपये व शेर्पे जैनवाडी येथील स्ट्रीट लाईट करीता दीड लाख रुपये तर बेर्ले भटवाडी स्ट्रीट लाईट करीता सुमारे साडे तीन लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या सर्व कामाचा शुभारंभ खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने खासदार विनायक राऊत व शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा शाल श्रीफळ व पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
error: Content is protected !!