सीबीएसई १० वी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे दिमाखदार यश…..

सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकाल, २२ विद्यार्थी ‘ए’ ग्रेड मध्ये…..

बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई १० वी परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट परंपरेला साजेसा निकाल देत सलग पाचव्या वर्षी १००% यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उच्चांक गाठले असून मराठी विषयात गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा केरकर आणि वेदांत सावंत या सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. आयटी विषयात खुशल सावंत, साहर्ष धुमाळे आणि वेदांत सावंत या तिघांनी शंभर टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तर हिंदी विषयात खुशल सावंत आणि साहर्ष धुमाळे यांनी १०० पैकी १०० गुणांची कमाई केली आहे._

_एकूण २२ विद्यार्थ्यांनी ‘ए’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण होत शाळेच्या यशात भर घातली आहे. या दिमाखदार यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे._

error: Content is protected !!