मालवण (प्रतिनिधी) : मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष तसेच राष्ट्रसंत श्री पाचले गांवकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान संपन्न झाला.
ह्या दरम्यान त्यांनी मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्विकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, उद्योजक सागर हडकर, उद्योजक परशुराम पाटकर, व्यावसायिक संजय गावडे, माजी नगरसेवक यतीन खोत तसेच वेंगुर्ले नगरपरिषद नगराध्यक्ष राजन गिरप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. १४ मे २०२६ रोजी मालवणच्या लीलांजली सभागृहात आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा होता असे श्रीकांत सावंत यांनी माध्यमांना प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे.
श्रीकांत सावंत यांनी मसुरे येथे पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, जिल्हापरिषद सदस्य क्षमा हडकर, डॉ साठे, राजन परब, बिळवस मानसी पालव, दत्तप्रसाद पेडणेकर, विलास मेस्त्री अशा मान्यवरांची भेट घेतली आणि ‘मसुरे सर्वांगीण विकास परिषद’ च्या स्थापनेबाबत विशेष चर्चा केली.
या माहिती देताना श्रीकांत सावंत यांनी, सर्व राजकिय व सामाजिक तसेच उद्योजकांशी झालेल्या गाठी भेटी व चर्चा सकारात्मक झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोकणच्या प्रत्येक व्यक्तिचा, गावाचा, शहरचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास यासाठी संघटीत होणे ही काळाची गरज आहे आणि त्याचसोबत भविष्यातील विविध कार्यांचे मानवतेने, एकात्म पद्धतीने, सौदार्ह्याने व सहकार्यपूर्वक नियोजन झाले तर कोकणच्या विकासाची घौडदौड कोणी रोखू शकणार नाही असेही श्रीकांत सावंत यांनी माध्यमांना प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे.
१४ मे २०२६ रोजी मालवणच्या लीलांजली सभागृहात आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त तृतीय वर्ष कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा फलदायी ठरला असेही श्रीकांत सावंत यांनी माध्यमांना प्रसिद्धी संदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.












