खारेपाटण (प्रतिनिधी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील कुणकवण येथे बौद्ध विकास मंंडळाच्या माध्यमातून नव्याने बांधण्यात आलेल्या बुद्धविहाराचे उद्घघाटन दि.१८ मे २०२३ रोजी सकाळी.१०.३० वाजता वंदनीय भदन्त मैत्रीयघोष आयुपाल,थेरो यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार असून दि.१९ मे २०२३ रोजी महामानवांचा भव्य संयुक्त जयंती महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बुद्धविहार समितीचे अध्यक्ष श्री अरविंद पांडुरंग जाधव यांनी दिली.
दि.१८मे २०२३रोजी सकाळी १0 वाजता बुद्ध विहाराचे उदघाटन, बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना, बुद्ध पूजापाठाचा धाम्मिक कार्यक्रम वंदनीय भदन्त मैत्रीयघोष आयुपाल,थेरो यांच्या शुभहस्ते होत असून त्यानंतर उपस्थित प्रतिष्ठत मान्यवरांचे स्वागत आणि आभार प्रदर्शन होईल.दुपारी १ वाजता स्नेह भोजन, सायंकाळी ४वाजता धम्म मिरवणूक आणि रात्री१० वाजता ऑर्केस्ट्रा गीतगुंजन. यांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
दुसऱ्या दिवशी दि.१९ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता भगवान गौत्तम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या. महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव तर सायंकाळी ४.०० वाजता खास महिलांसाठी "खेळ पैठणीचा " ७.०० वाजता मंडळाच्या सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा, रात्री ८.०० वाजता स्थानिक हौशी कलाकारांचा रंगमंची सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री १०.०० वाजता विलास जाधव आणि पार्टी यांचा गीत गायनांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्वानी या मंगलमय कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा मौजे कुणवण बौध्द विकास मंडळाचे कार्यकर्ते श्री अरविंद पांडुरंग जाधव यांनी केले आहे.













