खारेपाटण (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती मध्ये काही ना काही कला ही दडलेली असते.त्या कलाना बाहेर काढण्याचे काम सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई च्या वतीने करण्यात येत असून कोकणातील माणसे खूप प्रेमळ असून ती कलेवर नितांत प्रेम करणारी आहेत.” असे भावपूर्ण उदगार सिने अभिनेत्री पल्लवी वैद्य हिने तळेरे येथे सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी नृत्य शिबिराच्या समारोप कार्यक्रमा वेळी मार्गदर्शन करताना काढले.

सॅड्रिक डिसोजा डान्स अकॅडमी मुंबई च्या वतीने खारेपाटण,तळेरे व वैभववाडी येथे उन्हाळी नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला सुमारे १५० विद्यार्थी युवक – युवती व महिलांचा सहभाग लाभला होता. या नृत्य शिबिराचा सांगता समारंभ शनिवारी तळेरे येथील स्मित लॉन हॉल मध्ये सिने अभिनेत्री पल्लवी वैद्य,डान्स कोरोग्रफर सॅड्रिक डिसोजा, कणकवली पं.स चे माजी सभापती दिलीप तळेकर,सामजिक.कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर,संदीप तुळसकर,सौ सिद्धी वैभव मुद्राळे, पूजा चिंतामनी कल्याणकर, गिता तेजराज कल्याणकर,श्री सागर डबे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. उपस्थित सर्व मान्यवरांचे डान्स कोरोग्रफर सॅड्रिक डिसोजा यांच्या वतीने पुष्पगच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर या कार्यक्रमाला दिलीप तळेकर,संतोष पाटणकर संदीप तुळसकर यांनी शुभेच्छा दिल्या.

या समारोप कार्यक्रमाला खारेपाटण, वैभववाडी व तळेरे येथील सहभागी नृत्य शिबिरार्थी मुलांचे महिलांचे विविध डान्स परफॉर्मन्स सादर करण्यात आले.तर सिनेअभिनेत्री पल्लवी वैद्य व सॅड्रिक डिसोजा यांनी देखील मुलाबरोबर डान्स मध्ये सहभाग घेतला.व मुलांचा आनंद वाढवला. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश शिवराज यांनी केले.












