मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे बांबरवाडी येथे कलिंगड भरलेला टेम्पो पलटी होऊन अपघात

नडगिवे येथे गेल्या आठवडा भरातील हा तिसरा अपघात

वाहनाचे व कलिंगड मालाचे मोठे नुकसान

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी एस. टी. बस थांबा येथे एक अवघड वळणावर कलिंगड घेऊन येणारा टेम्पो आज बुधवार दि.२९/४/२०२६ रोजी भर दु.२.०० वाजताच्या सुमारास पलटी होऊन झालेल्या अपघातात टेम्पोचे नुकसान होऊन कलिंगड मालाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

याबाबत अधिक वृत्त असे की, वाहन चालक ऋतुराज जयराम वेलोडे वय २९ वर्षे राहणार चिपळूण रत्नागिरी याने आपल्या ताब्यातील पिकअप बेलोरो टेम्पो वाहन क्र. एम एच १६ ए वाय २०२८ वैभववाडी येथे अडीज टन कलिंगड माल गाडीत भरून चिपळूण सावर्डे येथे चालला असता मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाटेत खारेपाटण पासून जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी येथे एका अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात टेम्पोचे नुकसान होऊन कलिंगड मालाचे मोठ्या प्रमाणात सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. व सर्व कलिंगडाचा पेर पुऱ्या महुमार्गावर पडला होता. दरम्यान यावेळी चालक ऋतुराज याच्या बरोबर एकनाथ तांबे हे देखील टेम्पोत होते. त्यांच्या डाव्या हाताच्या कोपराला किरकोळ मार लागला..दरम्यान या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक सुमारे १ तास विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील पोलिस कॉन्स्टेबल शरद गुहाडे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची पाहणी केली. व महामार्गावर पलटी झालेला टेम्पो बाजूला करुन विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत सुरू केली.दरम्यान मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर वरील नडगिवे येथे गेल्या आठवडाभरात सलग तिसरा झालेला हा वाहन अपघात असून महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष न दिल्यास अपघातांची मालिका अशीच सुरू राहिल व त्यामुळे जनतेच्या रोषाला संबंधित अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आमचा अंत पाहू नका व मार्गावरील अवघड वळणे ताबोडतोब काढा असा इशारा स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गाने प्रशासनाला दिला आहे.

error: Content is protected !!