मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. शरद पवारांनाच अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी राजी केले जाणार आहे. त्यांचे मन वळविण्यात येणार आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून आक्रमक भूमिका आहे आणि आम्हा सगळ्यांची भावना आहे. आजच्या निवड समितीची बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार त्यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे, असे ठरविण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शरद पवार हेच अध्यक्षपदी कायम राहतील, अशा प्रस्ताव मंजूर केला, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
अखेर शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर











