वैभववाडी (प्रतिनिधी): श्री एकवीरा देवी उत्सव व ग्राम विकास मंडळ नानिवडे येथे आई श्री एकवीरा देवीचा १६ वा वर्धापन दिन आनंद सोहळा ९ मे २०२३ रोजी साजरा होणार आहे. या मंडळाने या कार्यक्रमानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार दिनांक ९ मे २०२३
सकाळी९.०० ते ११.०० श्री एकविरा देवी पूजा विधि
सकाळी ११.०० ते १.०० श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती
दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद
दुपारी २.०० ते ४.०० महिलांसाठी हळदीकुंकू व मानाची पैठणी खेळ
सायंकाळी ४.०० ते ७.०० लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व रेकॉर्ड डान्स
रात्रौ ७.०० ते ८.०० बक्षीस समारंभ व सत्कार समारंभ
रात्रौ ८.०० ते ९.०० महाप्रसाद
रात्रौ ७.०० ते ९.०० ढोल ताशा पथक विशेष आकर्षण
रात्रौ ९.०० ते १०.०० पालखी सोहळा रात्रौ १०.०० ते ११.०० स्थानिक भजन
रात्रौ ११.०० वाजता तिरंगी 20×20 भजनांचा जंगी सामना
श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ (खुडी – मुंबई )गुरुवर्य श्री रामदास जी कासले आणि श्री प्रमोदजी हर्याण
बुवा श्री किरण नारायण शिदृक
निना देवी प्रासादिक भजन मंडळ उंडील गुरुवर्य बुवा प्रकाश पारकर बुवा श्री व्यंकटेश नर
श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खूडी देवगड गुरुवर्य श्रीधर बुवा मुणगेकर बुवा श्री संतोष दत्ताराम जॉईन
असे प्रचंड भरघोस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री एकवीरा देवी उत्सव व ग्राम विकास मंडळ नानिवडे यांनी आयोजित केला आहे तरी सर्वांनी येऊन या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आई एकविरा देवीचा १६ वा वर्धापनदिन ९ मे ला होणार साजरा












