कणकवली (प्रतिनिधी): आज दि ०५/०४/२०२३ रोजी दारिस्ते गावात बौद्ध पोर्णिमेच औचित्य साधत दारिस्ते बौद्धवाडी समाज मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या जीमच उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच संजय सावंत, ग्रामपंचायत सदस्य भाई सावंत,नेहा सावंत, वैष्णवी सुतार, वृषाली कदम, तसेच चेअरमन बाबी साळसकर, पोलिस पाटील हेमंत सावंत, तसेच बबन गुरूजी, लक्ष्मण ठाकूर, बौध्द वाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दारिस्ते गावातील आणि बौद्ध वाडीतील सर्व लोकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांचे मनापासून मानले.













