देवगड (प्रतिनिधी) : बारसू रिफायनरी समर्थनार्थ केंद्रियमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे उदया दिनांक ६ मे रोजी देवगड तालुक्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरीक बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.याचे नियोजनाची आज आमदार संपर्क कार्यालय देवगड येथे बैठक घेवून करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,जि. का. सदस्य संदीप साटम अध्यक्ष पडेल मंडल अध्यक्ष डॉ अमोल तेली, संतोष किंजवडेकर अध्यक्ष देवगड मंडल,शरद ठुकरूल सरचिटणीस देवगडमंडल,उत्तम बिर्जे युवा मोर्चा अध्यक्ष शैलेश लोके गटप्रमुख मिठबांव,योगेश चांदोस्कर माजी नगराध्यक्ष संदीप तावडे शक्तीकेंद्र प्रमुख बाळा गावकर शक्तीकेंद्र प्रमुख देवगड, दया पाटील, युवा उपाध्यक्ष देवगड, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. बारसू रिफायनरी समर्थनार्थ रॅलीमध्ये देवगड मधून शेतकरी व नागरिकांना मोठया संख्येने सहभागी होणार आहेत.असे नियोजन करण्यात आले. असून जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन बाळ खडपे जिल्हा उपाध्यक्ष संदीप साटम जि. का. सदस्य यांनी केले आहे.













