शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा पुढाकार
चौके (प्रतिनिधी) : बुधवार दिनांक ६ मे २०२६ रोजी शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या प्रथम वर्धापन दिवसाचे औचित्य साधून, ३५० हुन अधिक गडकिल्ले सर करण्याचा ध्यास मनाशी बाळगुन कोकण दौऱ्यावर असलेल्या २३ गडकिल्ले सर करण्यासाठी तसेच भ्रमंती व दर्शनासाठी आलेल्या बाल – गिर्यारोहक म्हणुन अत्यंत कमी वयात (वय वर्षे ७) आतापर्यंत १७५ गडकिल्ले सर करत, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सह १०० पेक्षा अधिक पुरस्कार मिळवणाऱ्या, रायगड भुषण कु. शर्विका म्हात्रे यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष मयुर गोसावी यांच्या सिद्धिविनायक हॉल, ता.कुडाळ, जि सिंधुदुर्ग येथे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी लायन्स क्लब कुडाळ ता. अध्यक्ष आनंद कर्पे, शिवसंघर्ष संस्थेचे खजिनदार स्वप्नील गोसावी, सचिव प्रीती गुरव, सदस्य रोहित बेंडल, अविनाश साठले, अभिजीत गोसावी, प्रियांका गोसावी उपस्थित होते.












