सरस्वती हायस्कूल नांदगावचा दहावीचा १०० टक्के निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : सरस्वती हायस्कूल, नांदगाव विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल यंदा शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील सर्व ७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ५२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर १८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे. विद्यालयातून आदिती अजय चालके हिने ९०.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मृणाली प्राकनी मोरये हिने ८८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर आदिती अवधूत नाके हिने ८७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!