कणकवली (प्रतिनिधी) : लोरे-वाघेरी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, लोरे-वाघेरी संचलित विद्यामंदिर हायस्कूल, लोरे-वाघेरीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयातून यंदा एकूण २० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी, ७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर ५ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त करत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील कु. राणे समर्थ प्रशांत याने ८८.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. मांडकवर राज वसंत याने ८५.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तर कु. पाटील राहुल महेश याने ८२.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष तुळशीदास तुकाराम रावराणे, शालेय समिती अध्यक्ष मनोज तुळशीदास रावराणे, संस्था उपाध्यक्ष सुमन रावजी गुरव, संस्था सचिव प्रकाश पांडुरंग रावराणे, संस्था खजिनदार भूपेश एकनाथ राणे, सर्व संचालक मंडळ सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.












