कणकवली (प्रतिनिधी) : वारंगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ महादेव व्ही. केसरकर माध्यमिक विद्यालय, वारंगावने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील सर्व २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सलग १४ वर्षे शंभर टक्के निकालाची गौरवशाली कामगिरी विद्यालयाने केली आहे.
विद्यालयातील कु. आर्यन सुधाकर कुळकर्णी याने ९२.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. दिपेश संतोष पाण्डे याने ८९.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तर कु. मयुरेश महेश प्रभू याने ८९.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विजयशेठ केसरकर, मार्गदर्शक सल्लागार आमदार बाळा नांदगावकर, कार्याध्यक्ष सुधाकर नरे, सरचिटणीस प्रभेश राऊत, मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी, शाळा समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक हनुमंत वालके तसेच शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.












