कणकवली (प्रतिनिधी) : शिवाजी मेमोरियल हायस्कूल या विद्यालयाचा फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल ९३ टक्के लागला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदा परीक्षेसाठी एकूण १८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून विशेष यश संपादन केले.
विद्यालयात पूर्वा संतोष सावंत हिने ४८७ गुण (९८.६०%) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मुग्धा विकास साईल हिने ४७९ गुण (९७.६०%) मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. मनाली प्रसन्न देसाई हिने ४७३ गुण (९७.००%) मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच वैष्णवी कृष्णा कोळेकर हिने ४७२ गुण (९६.४०%) मिळवून चौथा क्रमांक, तर भार्गव भरत काणेकर याने ४६८ गुण (९४.२०%) मिळवून पाचवा क्रमांक मिळविला. संस्कृत विषयात पूर्वा संतोष सावंत, मुग्धा विकास साईल, मनाली प्रसन्न देसाई आणि वैदेही रविराज प्रधान या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन डॉ. एस. सी. सावंत साहेब, सचिव डी. एम. नलावडे साहेब, उपकार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे साहेब, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके सर व इतर शिक्षक वृंद यांनी केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.














