कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, कळसुली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) फेब्रु./मार्च २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रशालेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. सदर परीक्षेसाठी एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक – कु. भूषण प्रमोद दळवी (गुण – ४६८, शेकडा गुण – ९३.६० %)
द्वितीय क्रमांक – कु. मेघा प्रविण दळवी(गुण – ४४८, शेकडा गुण – ८९.६० %)
तृतीय क्रमांक – कु. मयुरेश सुरेश धुरी( गुण – ४४५, शेकडा गुण – ८९.००% )
तृतीय क्रमांक – कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री(गुण – ४४५, शेकडा गुण – ८९.००% )
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सूर्यकांत राजाराम दळवी, कार्याध्यक्ष – विजय पांडुरंग सावंत, सरचिटणीस – जय मारुती दळवी, सल्लागार – प्रकाश दळवी, सर्व संस्था पदाधिकारी तसेच स्कूल कमिटी चेअरमन – के. आर. दळवी, व्हाईस चेअरमन – नामदेव घाडीगावकर, सदस्य – रजनीकांत बळीराम सावंत, सदस्या – शुभदा देसाई व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – अनिल सावंत, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष – भालचंद्र रघुनाथ दळवी व पदाधिकारी, मुख्याध्यापक – व्ही. व्ही. वगरे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.
कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम












