कु. चंदना परशुराम गुरव ९१.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च २०२६ रोजी घेण्यात आलेल्या एस. एस. सी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेस अर्जुन रावराणे विद्यालयातील ७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्व उत्तिर्णे होऊन प्रशालेचा निकाल १००% लागला असून. ४५९ गुण मिळवून कु. चंदना परशुराम गुरव या विद्यार्थिनीने ९१.८० % गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला तर कु. शिवानी रत्नाकर फुटक व कु. वैष्णवी विश्वनाथ चव्हाण यांनी ४५३ गुणांसह ९०.६० % टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय क्रमांक पटकावला आणि कु. आर्या प्रदिप रावराणे हिने ४४३ गुणांसह ८८.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर व प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












