सावडावच्या आदर्श विद्यामंदीरची दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल कामगिरी
नांदगाव (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांत परीक्षेत आदर्श विद्यामंदीर, सावडावचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून कु. प्राजक्ता साईनाथ डगरे हीने ८३.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याबरोबर व्दितीय क्रमांक कु. पूर्वा बाजीराव डगरे ८१.४० % टक्के तर तृतीय क्रमांक कु. वैष्णवी अरविंद तेली हिला ७३.०० टक्के गुण मिळविले. विद्यालयातून एकूण १३ विद्यार्थी प्रविष्ट होत विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.उत्तीर्ण सर्व विद्यार्थाचे मुख्याध्यापक रविंद्र सावंत, संस्था पदाधिकारी, सभासद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले.

प्रथम क्रमांक- प्राजक्ता साईनाथ डगरे
83.4O%

द्वितीय क्रमांक- पूर्वा बाजीराव डगरे
81.40%

तृतीय क्रमांक- वैष्णवी अरविंद तेली
73%












