लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये दोन दिवस प्रदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : सात पिढ्यांची नाथपंथीय परंपरेची ज्ञानतीर्थ यात्रा गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालयाच्यावतीने नाथपंथीय महासिद्ध मोहिनी (वनस्पती) आणि रुद्राक्षांचे दुर्मीळ प्रदर्शन कणकवली कॉलेज मार्गावरील लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये सोमवार, १८ व मंगळवार, १९ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनादरम्यान दिव्य ‘मोहिनी रसायन’ अनुभवासाठी भेट म्हणूनही देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात उर्जा संतुलन यंत्र, मस्म, सुगंधी द्रव्य, खनिज, स्फटिक, वास्तू बांधणी, दिव्य महासिद्धी वनस्पती व रुद्राक्ष आदींचे प्रदर्शन असणार आहे. याशिवाय भेट देणाऱ्यांना नाथपंथीय पद्धतीने गूढ व उर्जात्मक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. खरे रुद्राक्ष कसे ओळखावे, औषधी वनस्पतींमध्ये कोणते गुणधर्म असतात, काही अतिशय दुर्मीळ वनस्पतींमुळे कोणती उर्जा मिळते, त्याचा वापर कसा करावा आदी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय वास्तूदोष अथवा कुटुंबात काही समस्या येत असल्यास त्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गवासियांनी अनुभव घेण्यासाठी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गूढ विज्ञान संशोधक ज्योतिषी रुद्रांग बाळ गोसावी यांनी केले आहे.














