बांदा (प्रतिनिधी) : कास ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या सदस्याची निवडणूक होऊन एक नंबर वार्ड मधून विश्वनाथ सखाराम पंडित यांची बिनविरोध निवड झाली. आज कास ग्रामपंचायत त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी कास सरपंच प्रवीण पंडित उपसरपंच श्रेया राणे ग्रामसेवक विनय धाकोर कर आशा सेविका मनीषा कामत आदी उपस्थित होते.













