आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लक्ष्मण दवणे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या (मानवाधिकार संरक्षण संघटना) माध्यमातून गेली सात वर्ष उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर कार्य करत, महाराष्ट्र राज्यात संघटनेची ताकद वाढविण्यासाठी लक्ष्मण दवणे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपून महाराष्ट्रातील तमाम पदाधिकाऱ्यांशी व सदस्यांबरोबर असलेला सातत्यपूर्ण संपर्क, तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, यामुळे त्यांची संघटनेमध्ये व समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तसेच शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार लक्ष्मण दवणे यांची सलग आठव्यांदा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या फेरनिवडीबद्दल कोकण विभागातील सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.












