पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसे आणि ठाकरे गटाला जोरदार धक्का

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथे गुरुवार, दि. १५ मे २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख कुमारी सिद्धी संतोष वसंत नारकर आणि मांगवली शाखा प्रमुख सचिन आयरे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात भाजपा कार्यकर्ते राजेंद्र राणे, महेश संसारे, कोळपे पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे तसेच मांगवली गावचे सरपंच शिवजी नाटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पक्षप्रवेशामुळे मांगवली परिसरात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

error: Content is protected !!