पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात मा.आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मध्ये शिवसेनेचे जोरदार आंदोलन

“सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे स्पीकरवर लावून सरकारचा केला निषेध

पेट्रोल पंपावर रांगा लावलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडून “साठेबाज” म्हणून हिणवणूक-वैभव नाईक

परराष्ट्र धोरण आखण्यात मोदींना अपयश-जीजी उपरकर

कणकवली (प्रतिनिधी) : पेट्रोल डिझेलमध्ये सातत्याने होणाऱ्या दरवाढी विरोधात आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ शहरात कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी वाढत्या महागाईवर भाजप आमदार यांनी म्हटलेले “सखी सैंया तो खूब ही कमात हैं, महंगाई डायन खाए जात है!” हे गाणे आणि पंतप्रधान मोदींनी महागाई विरोधात केलेली जुनी भाषणे सायकलला स्पीकर लावून वाजविण्यात आली. वैभव नाईक यांनी ती सायकल हातात घेऊन कुडाळ शिवसेना शाखा ते जिजामाता चौक येथून एसटी स्टॅन्ड पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दरवाढीचा निषेध करण्यात आला. कहा गये , कहा गये, अच्छे दिन कहा गये! पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो! रद्द करा, रद्द करा पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करा!, पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेच पाहिजेत! अशा आशयाचे फलक झळकविण्यात आले. आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वैभव नाईक म्हणाले गेल्या आठ दिवसात चारवेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली अजून यापुढेही दरवाढ होत राहणार आहे. त्यामुळे भाजी, दुध, खाद्य पदार्थ,बांधकाम साहित्य अशा सर्वच वस्तू महागल्या आहेत. कोथंबीर पेंडी ७० रु. झाली आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिकांना महागाईचा फटका बसला आहे. सरकार मात्र वारंवार आश्वासने देत आहे. पैसे असूनही डिझेल पेट्रोल मिळत नाही.पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत त्यांना साठेबाज म्हणून सरकार हिणवत आहे. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळणे मुश्किल झाले आहे. २०१४ पूर्वी पेट्रोल डिझेल दरवाढीवरून आणि रुपयाचे मूल्य घटल्यावरून मोदींनी तत्कालीन सरकारवर टीका केली होती. मोदींनी परराष्ट्र धोरण चुकविल्यामुळे रुपयाचे मूल्य घटले असून सर्वसामान्यांना दरवाढ सोसावी लागत आहे असा आरोप वैभव नाईक यांनी केला. माजी आमदार जीजी उपरकर म्हणाले, जनता महागाईने बेहाल झाली आहे.अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. शेतीचा हंगाम तोंडावर आला असून नागरिक व शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल मिळत नाही. मोदी सरकारचे हेच अच्छे दिन आहेत काय? आपले पंतप्रधान अमेरिकेचे गुलाम झाले असून परराष्ट्र धोरण आखण्यात मोदींना अपयश आल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.जनतेने देखील महागाईचा तीव्र विरोध केला पाहिजे अन्यथा हि महागाई वाढतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,उपनेत्या जान्हवी सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,कुडाळ तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे,सचिन कदम, तालुका संपर्कप्रमुख अतुल बंगे,शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, जिल्हापरिषद सदस्य गंगाराम सडवेलकर,माजी उपसभापती जयभारत पालव ,पं.स. सदस्य बाळा कांदळकर,अर्चना बंगे,ममता राऊळ,युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर,गुरु गडकर,अमित राणे, दीपक आंगणे,एकनाथ धुरी,रवी बुवा कदम,राजेंद्र घाडी,अवधूत मालणकर, भगवान परब,नंदू आंबेरकर, बाळू पालव, सागर भोगटे, विनय पालकर,अशपाक कुडाळकर, समीर पालव,रुपेश तायशेटे,तुषार सामंत,सुरेंद्र तेली,विनय गावडे,पूजा राऊळ,सचिन ठाकूर,महादेव परब,सुनील पवार,हरी वायंगणकर,मंगेश बांदेकर,भगवान परब,नंदू आंबेरकर,उमेश परब,सुधीर लुडबे,विरेश परब,संतोष सामंत,रोहन शिरसाट,संजय कदम,बाबू सावंत,रुपेश शिरोडकर,राजेश टंकसाळी,आप्पा मांजरेकर,विनय कदम,प्रताप साईल, श्री. काराणे,दत्तगुरु राऊळ,प्रकाश निकम. बाबी निकम आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!