कणकवली इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य गांगल यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील एस एस पी एम इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिश चिंतामण गांगल वय (49) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. डॉ. गांगल हे खेड येथे आपल्या गावी गेले होते. तिथे त्यांच्या प्रकृती आस्वास्थ्या मुळे मुंबई येथे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचे आज दुपारी निधन झाले. गेली पाच वर्ष एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते.

error: Content is protected !!