दोडामार्ग (प्रतिनिधी): घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्याखाली अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरच्या महिलेचा गळा दाबून खून करून नंतर दगडाने चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे घटनास्थळी दाखल झाल्यात. बेहरा विद्रुप करण्यात आल्याने सदरच्या महिलेची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांनी गोव्यातून दोघा संशयिताना ताब्यात घेतले आहे. नाजूक संबंधातून खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, घोटगेवाडी येथीत पुरोहित श्री. मणेरीकर हे गुरांना घेऊन नदीकाठावर पाणी पाजण्यासाठी आते असता त्यांना एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आता त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेच्या अंगावर लाल रंगाचा कुर्ता होता. तसेच हातात एक सोन्याची बांगडी तर हाताच्या बोटात एक अंगठी आढळून आली. शिवाय चपलाही आढळून आल्या आहेत. सदरच्या महिलेचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला असल्याने ओळख पटलेली नाही. दरम्यान सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेचा चेहरा विद्रुप करण्यासाठी वापरलेला दगडही घटनास्थळीच आढळून आला आहे. दगडावर रक्ताचे डाग आहेत. घटनेची
माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक घोडगेवाडीत दाखल झाले. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, संदीप भोसले, केसरकर, रवी इंगळे आदीनी घटनास्थळाची पाहणी केली.