लक्झरीतून आंबा वाहतुकीस आडकाठी नको!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सातारा आरटीओला सूचना

कणकवली (प्रतिनिधी): कोकणातून शेतकरी थेट मुंबई, पुणे आदी मार्केटमध्ये लक्झरी बसद्वारे जाणाऱ्या आंब्याच्या पेटया न अडविण्याच्या सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातारा आरटीओ विभागाला दिल्या आहेत. तसेच गेल्या आठवड्यात ज्या आंब्याच्या पेट्या अडविण्यात आल्या होत्या त्यासंदर्भात तातडीने सविस्तर अहवालही सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. सध्या आंबा, फणस, काजू आदी कोकणातील फळांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, आंबा पेट्यांच्या व्यवसायात मूळ शेतकऱ्यापेक्षा दलाल फायदा अधिक काढतात. यामुळे कुडाळ, देवगड, मालवण आदी भागातील आंबा बागायतदार मुंबई, पुणे येथे दोन दोन डझनाचे बॉक्स लक्झरीने पाठवित होते. मात्र, सातारा आरटीओकडून गेल्या आठवड्यात अशाप्रकारे लक्झरी बसने पाठविलेले आंबे उतरवून घेण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर अशा लक्झरीमधून उतरवून घेतलेले आंबे नंतर टेम्पोच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. लक्झरी बसच्या माध्यमातून शेतकरी थेट आंबा मार्केटला नेत होते. यामुळे काही अंशी दलालांना आळा बसत होता. त्यामुळे आरटीओ व दलाल यांचे यात संगनमत असल्याची शक्यताही काळसेकर यांनी व्यक्त करीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर चव्हाण यांनी सोमवारी तातडीने बैठक आयोजित केली होती. सदरच्या बैठकीत अशाप्रकारे लक्झरीमधून आंबे उतरवून घेण्याच्या प्रकाराबाबत पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!