बांदा (प्रतिनिधी) : बांदा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 69/2026, बीएनएस कलम 303(2) अंतर्गत चोरीला गेलेल्या मोटरसायकल प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंगार विक्रेता रज्जाक खान याच्या टेम्पोमध्ये चोरीला गेलेली मोटरसायकल उघडलेल्या अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तात्काळ मोटरसायकल ताब्यात घेऊन चौकशी केली असता, एका अल्पवयीन मुलाने ती मोटरसायकल उघडलेल्या स्थितीत आपल्याला दिल्याचे समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी भंगार विक्रेता रज्जाक खान याला ताब्यात घेतले असून, चोरीला गेलेली मोटरसायकल उघडलेल्या अवस्थेत जप्त करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाचा पुढील तपास सुरू आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला हवालदार धरणे करत आहेत.












