सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गांच्यां समस्यां विषयी चर्चा करुन सहकार्य करण्याची विनंती
आचरा (प्रतिनिधी) : मालवण पंचायत समिती नुतन गटविकास अधिकारी वर्ग १ परागिणी पाटील यांची सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने तालुका कार्यकारिणीने सदिच्छ भेट घेतली. जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत गणेश प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गांच्यां समस्यां विषयी चर्चा करुन सहकार्य करण्याची विनंती केली. सिंधुदुर्ग मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडील जावक क्रमांक ४५४ तारीख २७-०५-२०२६ च्या पत्राकडे लक्ष वेधून त्याची अंमलबजावणी तालुका पातळीवरुन त्वरीत करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. यावेळी सदस्य ए.एन्.ओटवणेकर, एस्.टी.गावडे, पी.टी.पेडणेकर आदी उपस्थित होते.












