श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सेवाभाग्य; प्रज्ञापुरी ट्रस्टकडून समर्थ आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची देणगी

गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी स्वामी सेवा; प्रज्ञापुरी ट्रस्टचा समर्थ आश्रमात मदतीचा हात

    खारेपाटण (प्रतिनिधी) : “गरजवंताना दान करणे हे कार्य म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने लाभलेले सेवाभाग्य आहे. समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि त्यांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी स्वामी सेवा आहे.” असे भावपूर्ण उदगार मुंबई जोगेश्वरी येथील प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त अंकिता पांचाळ यांनी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत जीवन आनंद संस्था संचालित विरार फाटा-वरठा पाडा येथील समर्थ आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची देणगी दान करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी काढले.

    धार्मिक आणि सामाजिक कार्याचा समन्वय साधणाऱ्या या संस्थेने गरजू,निराधार आणि वंचित घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून समर्थ आश्रमातील रहिवाशांसाठी आवश्यक वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले. जीवन आनंद संस्थेच्या वतीने प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टचे या मदतकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले असून,अशा सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे निराधार आणि वंचित व्यक्तींना मोठा आधार मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    या कार्यक्रमाला प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थ अँड चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अ‍निमेश जोशी, अंकिता पांचाळ, सिद्धीका अनभवणे, महेश शेलार, वैभव माळुंजकर यांच्यासह अक्षता बावलेकर, अभिषेक बावलेकर, अनिष पांचाळ,स्नेहल घोसाळकर, सुवर्णा चौघुले, पूजा मुंडेकर, अर्चना जोशी, मनाली कदम, प्रेरणा मुंडेकर, श्रेयस मांगले, हर्षदा मुंडेकर, वैभवी तरांगे, विवेक तरांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर समर्थ आश्रमाचे भाईदास माळी, दीपक अडसुळे, दिपाली मेघा माळी, हेमलता पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

    error: Content is protected !!