देवगड (प्रतिनिधी) : मीठमुंबरी जलसमाधी आंदोलन रागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल जमावबंदी आदेशाचे उल्लंघन बेकायदेशीर जमाव आणि शासकीय आदेशाचा अवमान केल्याचा आरोप देवगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मीठमुंबरी येथे जलसमाधी आंदोलन आयोजित केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे नेते बागायतदार संघटनेचे पदाधिकारी आणि इतर आंदोलन कर्त्यांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा तसेच आंबा बागायतदारांना वाढीव नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मीठमुंबरी समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते मात्र त्या आंदोलन वेळी जिल्ह्यात जमाबंदी आदेश लागू असतानाही मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केल्याने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप पोलिसांनी केला. या प्रकरणात खासदार राजू उर्फ देवाप्पा अण्णा शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष आनंद ढोके, गणेश गावकर, गणेश वाळके, रामानंद वाळके, स्वप्निल तोडणकर, अजय नानेरकर, संजय आचरेकर, दिनेश धुवाळी, किरण टेंबु ळकर, उमेश कुलकर्णी, सुशांत नाईक, प्रसाद लोखंडे, शरद परब, माजी आमदार वैभव नाईक, शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळस्कर, उद्धव बाळासाहेब गटाचे तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, मनसेचे चंदन मिस्त्री, धीरज घाडी, धीरज परब, डॉक्टर मंगेश सावंत, राजेंद्र गड्याळकर विविध राजकीय पक्ष आणि संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या समावेश असून इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 135, 37 तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 189(2) 190 आणि 223 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे हे प्रकरण देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रविंद्र महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आले असून पुढील तपास देवगड पोलीस करीत आहे.
जलसमाधी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल












