कणकवली (प्रतिनिधी) : वागदे येथे 2 मे रोजी लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात झाला होता. सदर भीषण अपघात मध्ये 44 लोक जबर जखमी झाले होते. सारे जखमी देवगड पाटगाव मधील होते. सदर जखमी लोकांना वागदे सरपंच श्री संदीप रमाकांतसावंत तसेकंग वागदे ग्रामस्थांनी अपघात होताच तात्काळ मिळेल त्या वाहनांनी, ऍम्ब्युलन्स ने अपघात ग्रस्त जखमींना दवाखान्यात ऍडमिट केले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सरकारी दवाखान्यात प्रायव्हेट डॉक्टराची व्यवस्था करत तात्काळ जखमींना वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली.म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करत आज पाटगाव.देवगड मधील सरपंच उपसरपंच. व ग्रामस्थ यांनी वागदे ग्रामपंचायत मध्ये येऊन वागदे सरपंच श्री. संदीप रमाकांत सावंत.वागदे ग्रामस्थ यांचे आभार मानले..उपस्थित पाटगाव मधील. सुरेष गुरव. संतोष गुरव. संदीप गुरव. दीपक गुरव. बाळकृष्ण गुरव. प्रवीण गुरव. अवि गुरव. पाटगाव मुंबई मंडळ अध्यक्ष. श्री संदीप सावंत यांनी सर्वांचे आभार मानले












