मुणगे आडवळवाडी येथे आज १३ मे रोजी पारंपारिक आध्यात्मिक डबलबारी भजन!

मसुरे (प्रतिनिधी): आडवळवाडी एकता मंडळ, मुणगे येथे सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापूजा १३ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ ते ६ वा. हळदीकुंकू समारंभ,सायं ६ वा. श्री सत्यनारायण महाआरती, रात्रौ ८ वा. स्थानिक भजन, रात्रौ ९.३० वा. पारंपारिक आध्यात्मिक डबलबारी भजन सामना बुवा : ह.भ.प. नंदादिप वंजारे डोंबिवली (पू) विरुद्ध बुवा आनंद जोशी (नाडण) यांच्यात होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन आडवळवाडी एकता मंडळ, मुणगे यांनी केले आहे.

error: Content is protected !!