युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती
आचरा (प्रतिनिधी): इस्कॉन तर्फे “हरे कृष्ण सत्संग भवन” या नूतन वास्तूचा शुभारंभ कणकवलीत संपन्न झाला. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. यावेळी डॉ.संजय दळवी यांनी सुशांत नाईक यांचा सत्कार केला. इस्कॉन टेम्पल हे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. आता आपल्या कणकवलीत इस्कॉन सत्संग भवन च्या नवीन वास्तूचा शुभारंभ संपन्न झाला. त्या प्रित्यर्थ हरीनाम कथा, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. संजय दळवी, राणे, सावंत सर, अमिता सावंत, व इस्कॉन सत्संग भवन चे सर्व सभासद उपस्थित होते.











