कणकवली (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाची छाती गर्वाने फुगते आजकालच्या व्हाट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात मैदाना बाहेरील खेळ आजकालच्या नव्या पिढीपासून दूर होत चाललेत अंगणात रांगणार मूल आता मोबाईलच्या छोट्या स्क्रीन वरती रमू लागलाय परंतु प्रत्येक आई-वडील आपापल्या परीने त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार करत असतात आणि त्यात मोलाची भर घालते ते श्री सिद्धिविनायक संस्कार शिबिर आपल्या मातीतला खेळ लाठी,काठी,ढाल,तलवार,भालाफेक,दांडपट्टा असं सात दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण सोमवार दिनांक 8 मे ते 14 मे 2023 रोजी सकाळी 7 ते 9:30 व सायंकाळी 4 ते 6:30 वाजेपर्यंत शिबिराचा पत्ता पार्वती सदन मुक्काम पोस्ट बिडवाडी-मगरवाडी तालुका, कणकवली जिल्हा, सिंधुदुर्ग या शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील व्यक्तींना संपर्क करा किंवा त्यांना व्हाट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज करून आपले नाव, वय, उंची, शिक्षण, वाडी, संपर्क, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती कळवणे आणि शिबिरातील सहभागी मुले आणि त्यांचे पालक वर्ग मित्रमंडळी यांनी दिनांक 14 मे 2023 रोजी संपन्न होणाऱ्या शिबिर समारोप कार्यक्रमासाठी किल्ले रामगड येथे आवर्जून उपस्थित रहावे आणि मुला मुलींचे खडतर परिश्रमाच कौतुक करून आणि त्यांच्या कलागुणांना भरभरून दाद द्यावी असे आवाहन श्री सिद्धिविनायक संस्कार शिबिर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.












