कणकवलीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ’10 किमी रन मॅरेथॉन -2026′ स्पर्धेचे आयोजन

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन..

कणकवली (प्रतिनिधी) : स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग, कणकवली तालुका पत्रकार संघ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘कणकवली 10 किलोमीटर रन -2026’ या भव्य ‘मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन रविवार 30 ऑगस्ट 2026 रोजी स.७ वा करण्यात आले आहे. कणकवली कॉलेज मैदान येथे होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील धावपटूंसाठी ही स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पोस्टरचे प्रकाशन कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण, राज्य समन्वयक तथा कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड, स्पोर्ट्स फाऊंडेशनचे सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण कदम उपस्थित होते.

स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून सुरू झाली असून विविध वयोगटांतील मुला-मुली तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र गट १० गटात ठेवण्यात आले आहेत. 12वर्षांखालील गटासाठी- 2 किमी, 14 व 17 वर्षांखालील गटासाठी- 3 किमी, 19 वर्षांखालील गटासाठी- 5 किमी, तर खुल्या गटासाठी 5 किमी आणि 10 किमी अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वयोगटानुसार स्पर्धेची प्रवेश फी 12 वर्षा आतील मुले व मुली (2 किमी) रुपये -275, 14,17 वर्षा आतील मुले व मुली (3 किमी) रुपये -275, 19 वर्षा आतील मुले व मुली व खुला गट महिला व पुरुष (5 किमी) रुपये -375, आणि खुला गट महिला व पुरुष (10 किमी) रुपये 425 अशी निश्चित करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, सहभाग प्रमाणपत्र आणि नाश्ता देण्यात येणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक संघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष बयाजी बुराण तसेच राज्य समन्वयक तथा कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाळकृष्ण कदम मोबा –९१६७४६७७९६आणि सहसचिव तेजस घाडीगावकर मोबा- ९५२९९४०४६१ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी.याशिवाय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी पोस्टरवरील QR कोडद्वारे किंवा https:racesregistrations.com/event/501 या लिंकचा वापर करून नाव नोंदणी करता येणार आहे. तरी जिल्ह्यातील धावपटूंनी आयोजकांशी संपर्क साधून वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन स्पोर्ट्स फाऊंडेशन सिंधुदुर्ग व कणकवली तालुका पत्रकार संघाने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात केले आहे. “आजची मेहनत, उद्याच्या यशाची हमखास खात्री” या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!