परमहस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग 2 ऑगस्टपासून दर रविवारी वर्ग : प्रवेश प्रक्रिया सुरु

कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ कणकवली आयोजित इयत्ता सातवी व इयला चौथी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ रविवार 2 ऑगस्ट रोजी होणार आहे.
या मंडळामार्फत 1982 पासून नियमित मार्गदर्शन वर्ग घेण्यात येत आहेत. मंडळाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत गणित, बुद्धिमत्ता, मराठी व इंग्रजी या विषयांचे मार्गदर्शन करण्यात येईल. हे मार्गदर्शन वर्ग फक्त मराठी व सेमी इंग्लिश माध्यमांसाठीच आहेत.

या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ रविवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9-30 वाजता काशीभवन भक्तनिवास सभागृह येथे संपन्न होणार असून चौथी व सातवी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहावे. शुभारंभ कार्यक्रमानंतर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे चे गणित विषयाचे स्वतंत्र वर्ग होतील तसेच पालकांसाठीही मार्गदर्शन वर्ग होईल. या मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरून द्यावा लागेल. या अर्जात नाव, शाळा, इयत्ता, जन्मतारीख, संपर्क मोबाईल नंबर, वॉट्‍सॲप नंबर व विद्यार्थाचा यावर्षीचा फोटो लावून व प्रवेश शुल्क 200/- (स्वाध्याय व सराव परीक्षेसह) भरून संस्थानच्या काऊंटवर सादर करून पावती घ्यावी. प्रवेश अर्ज संस्थान कार्यालयात 22 जुलैपासून उपलब्ध असतील. प्रत्येक वर्गात 30 विद्याथीना प्रवेश दिला जाईल. 2 ऑगस्ट पूर्वी आपला प्रवेश निश्चित करावा.अधिक माहितीसाठी गजानन उपरकर, अध्यक्ष शैक्षणिक मंडळ (9561347525), विजय केळुस्कर व्यवस्थापक (9421238925), संस्थान कार्यालय (02367-232351), शरद हिंदळेकर, प्रकाश परब, सदानंद गावकर, सुहास आरोलकर यांच्याशी संपर्क साधावा. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, खजिनदार दादा नार्वेकर, सचिव निवृत्ती घडाम, सर्व विश्वस्त व शैक्षणिक मंडळ सदस्यांनी केले आहे.

error: Content is protected !!