वायंगणी स्वामी समर्थ मठ येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव….!

आचरा (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, वायंगणी मालवण येथे बुधवार २९ जुलै २०२६ रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकाळी ५ वा. दुग्ध अभिषेक, सकाळी ७.३० वा. नित्य आरती. सकाळी ९.०० वा. अभिषेक, सकाळी १०.०० ते सायं. ९.०० वा. सुस्वर भजने, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १.०० वा. महाप्रसाद, श्री स्वामी समर्थ (यांना गुरु घेणे) गुरुदिक्षा हा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी व ग्रामस्थांनी तिर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच ज्या स्वामी भक्तांना महाप्रसाद सेवेत वस्तू किंवा देणगी स्वरुपात सहभागी व्हायचे असेल त्यांनी मठातील सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा. रुपेश राणे – 9511827951 असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वायंगणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!