शिक्षक समितीचा वर्धापन दिन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरा होणार

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचा ६४ वा वर्धापन दिन राज्यभर मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा वर्धापन दिन बुधवार २२ जुलै रोजी सर्व तालुक्यात विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी दिली.

शिक्षक समिती ही राज्यभरातील शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात बलाढ्य संघटना असून राज्यातील सर्व जिल्ह्यात व सर्व तालुक्यात शाखा असणारी सक्रीय संघटना आहे.२२ जुलै १९६२ रोजी स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे.कोणत्याही राजकीय पक्षाचा आश्रय न घेता कार्यरत असणारी ही एकमेव संघटना आहे.

२२ जुलै २०२६ रोजी संघटनेचा ६४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून सिंधुदुर्गात सर्व तालुक्यात खालीलप्रमाणे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
वेंगुर्ला तालुका-दत्तक विद्यार्थी, आपत्कालीन निधी,विद्यार्थी- शिक्षक गुणगौरव कार्यक्रम,सावंतवाडी तालुका-
आरोस धनगर या दुर्गम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप,कणकवली तालुका-
उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे फळ वाटप तसेच दोन वॉर्ड साठी एक्झॉस्ट फॅन भेट,देवगड तालुका
गंभीर आजारी शिक्षण सेवक श्री.पराडकर यांना रुपये ५१०००/- रूपयाचे आर्थिक योगदान,मालवण तालुका-शिक्षक समिती सभासद पाल्य गुणगौरव कार्यक्रम,कुडाळ तालुका-संविता आश्रम अणाव येथे अनाथ मुलांसाठी धान्य व इतर आवश्यक साहित्य वाटप,वैभववाडी तालुका-समृद्ध ग्रंथालय पंचायत समिती वैभववाडी साठी रुपये ३५०००/-किमतीची पुस्तके भेट,दोडामार्ग तालुका-दोडामार्ग रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करणे,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

अशाप्रकारे विविध सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमांनी शिक्षक समिती वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!