7 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार पुरस्कार वितरण
34 वर्षांच्या पत्रकारितेसह सामाजिक कार्याचा होणार गौरव
सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग न्यूज च्या बांदा प्रतिनिधी पत्रकार मंगल कामत यांना मानाचा स्टार आयकॉन पुरस्कार जाहीर झाला असून 7 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह बिबवेवाडी पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पुरस्कार वितरण केले जाणार आहे. मंगल कामत यांच्या सामाजिक कार्यासह मागील 34 वर्षांच्या समाजाभिमुख प्रदीर्घ पत्रकारितेच्या कार्याची दखल घेऊन भास्कर भूषण च्या वतीने कामत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पत्रकारितेच्या काळात सुमारे तीन हजार पेक्षा जास्त बातम्या व विशेष बातम्या त्यामध्ये गुन्हेगारी, सांस्कृतिक, कला क्रिडा व सामाजिक विषयांवर लेखन. दैनिक रत्नागिरी टाईम्स डिसेंबर १९९३ ते डिसेंबर १९९४ / दैनिक पुढारी जानेवारी १९९५ ते २००३ दैनिक लोकमत २००५ ते २००८ / लाईव्ह सिंधुदुर्ग न्युज चॅनेल २००९ ते ऑगस्ट २०१५ / सिंधुदुर्ग लाईव्ह न्युज चॅनेल १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑक्टोंबर २०२२ / माझा सिंधुदुर्ग न्युज चॅनेल २०२२ ते डिसेंबर २०२५ / आपला सिंधुदुर्ग न्युज चॅनेल १ जानेवारी २०२६ ते आज पर्यंत.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार २०१४ / सिंधुदुर्ग लाईव्ह चे स्टार पत्रकार म्हणून सतत ३ वर्षे पुरस्कार / दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा पुरस्कार. महिला दिनानिमित्त सावंतवाडी सखी महिला कडून पुरस्कार / इंटरनॅशनल वुमन राईट पुरस्कार. / सिंधुदुर्ग जिल्हयातील अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांकडून गौरव, असे अनेक पुरस्कार प्राप्त केले तसेच माझा जीवन प्रवास हे आत्मचरित्र प्रकाशित भास्कर भूषण पुरस्कार प्राप्त केले आहेत.
विशेष कार्य आणि सामाजिक योगदान कास येथे खाते बाहय पोस्ट मास्तर म्हणून ऑक्टोंबर १९७८ ते जून १९८३ पर्यंत कार्यरत / विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून २०१७ ते २०२२ पर्यंत कार्यरत / सामाजिक दायित्त्व बांदा पोलिस स्टेनशनचर महिला दक्षता समितीवर गेल १५ वर्षे सदस्य म्हणून कार्यरत (विनामोबदला) अनेक मुली व महिला पिढीतांना न्याय दिला / रोणापाल येथील दयासागर छात्रालयावर (गरिब गरजू मुलांसाठी शिक्षणाच्या सोयीसाठी अखिल भारतीय सेवा अभियान चेन्नईचे छात्रालय) गेली १४ वर्ष विनामोबदला कार्यरत आहे. / मनोरुग्ण तज्ञ डॉ रूपेश पाटकर यांच्यासोबत २०१७ पासून शाळांमधून किशोर बयीन मुलींना मार्गदर्शन / नारायण आश्रम कोळोशी येथे आरोग्य सेविका प्रशिक्षण पूर्ण-२७ नोव्हेंबर १९९३ ते ११ डिसेंबर १९९३. श्रीमती. मंगल शांताराम कामत यांचे सर्व पत्रकारीत्यान कडून हार्दिक अभिनंदन













