अखिल भारतीय बार परीक्षेत युगंधरा मोदी चे पहिल्याच प्रयत्नात अभिनंदनीय यश !

फोंडाघाटच्या इतिहासात सुवर्णक्षण ! सर्वांकडून अभिनंदन व कौतुक.

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ची सुकन्या कु. युगंधरा रमेश मोदी हिने अखिल भारतीय बार परीक्षा ( AIBE ) पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊन इतिहास घडवला. याबद्दल तिचे व पालकांचे फोंडाघाट मध्ये मित्र परिवाराकडून व ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे. ही परीक्षा बार कौन्सिल ऑफ इंडिया ( BCI ) द्वारे घेतली जाणारी, एक अनिवार्य पात्रता परीक्षा आहे.कायदा (लॉ) परीक्षा पूर्ण केल्यानंतर, भारतातील न्यायालयात वकिली करण्यासाठी ही परीक्षा व सराव प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक आहे….

युगंधराने ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होताना, फोंडाघाटच्या इतिहासात सुवर्णपान लिहिले आहे. प्राथमिक शिक्षण केंद्रशाळा नंबर १ तसेच माध्यमिक अकरावी- बारावी शिक्षण फोंडा हायस्कूल जुनियर कॉलेजमध्ये पूर्ण केले. पदवीचे शिक्षण इकॉनॉमिक्स विषयात सुविधांची वाणवा असताना सुद्धा फोंडाघाट आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयां मध्ये पूर्ण करून, व्हिकटर डांटस लॉ कॉलेज, कुडाळ येथे कायद्याची ( LLB) डिग्री घेतली आणि पहिले यशस्वी पाऊल पूर्ण केले. तिने यशस्वी उद्दिष्टांना मूर्त रूप देताना, अनेक अडथळे पार केले.तिच्या यशाबद्दल फोंडावासीयांना युगंधाराचा सार्थ अभिमान असल्याचे कौतुक ग्रामस्थांकडून होत आहे….

error: Content is protected !!