भुईबावडा कॉपीप्रकरणी दुसऱ्या संशयिताला अटक; न्यायालयीन कोठडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : दहावी बोर्डाच्या भुईबावडा केंद्रावर घडलेल्या  कथित कॉपी प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी संजयकुमार आडे याला सोमवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी अटक केली. त्याला मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान झालेल्या कथीत कॉपी प्रकरणी उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय राठोड व हेत हायस्कूलचे शिक्षक संजयकुमार आडे आणि उत्तरपत्रिका लिहून देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कॉपी प्रकरणातील मुख्य आरोपी संजय राठोड याला यापूर्वीच वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला तीन दिवसाची कोठडी झाली होती. तर सोमवारी त्याला जमीन मंजूर झाला होता. यातील दुसरा आरोपी संजयकुमार आडे याला सोमवारी रात्री वैभववाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून त्याचा मोबाईल व या गुन्ह्यात वापर करण्यात आलेली ओमणी मारुती गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे.

त्यामुळे या गुन्ह्यातील दोन आरोपी व एक अल्पवयीन आरोपीची वैभववाडी पोलिसाकडून चौकशी करण्यात आली आहे. यातून पोलिसांना महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत.

दरम्यान संजय राठोड यांना जमीन मंजुर झाल्यानंतर ते आपल्या माध्यमिक विद्यालय उंबर्डे येथे हजर झाल्याची माहिती मिळत आहे. एकदा कर्मचारी एखाद्या गुन्हात पोलीस कोठडीत गेल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. परंतु राठोड यांच्यावर अशा प्रकारची निलंबनाची कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

error: Content is protected !!