भंडारा उधळत ग्रामस्थांकडून जल्लोशात स्वागत
सोलापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर ते सोलापूर जिल्ह्यातील झापाचीवाडी गावामध्ये तब्बल शेकडो कि.मी. पायी अंतर पार करून बाळुमामाची पालखी दाखल झाली आहे.
या पालखीसोबत सुमारे १५० पेक्षा अधिक भक्तगण सहभागी झाले आहेत. तब्बल कोल्हापूर, सांगली व सोलापूर या तीन जिल्ह्यांतून आलेल्या या पालखीचे विविध गावातील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तीभावाने पुजन करुन’ बाळुमामाच्या नावाने ‘चांगभलं चा जयघोष ‘करीत स्वागत केले तर उदनवाडी व झापाचीवाडीतील ग्रामस्थांनी भव्य मिरवणीकीद्वारे जल्लोषात स्वागत केले.
या सोहळ्याच्या निमित्ताने आज मंगळवारी बाळूमामा मंदिरात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.











